विश्वभारती पब्लिक स्कूल मध्ये “गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विश्वभारती पब्लिक स्कूलने गुरुउत्सव साजरा केला. आपला शाळेतील सर्व ‘शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी’ यांना आपल्या जीवनातले सर्वात मोठे गुरु मानले अशी संकल्पना यावेळी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ‘शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना या वेळी अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले. .
कार्यक्रमात आपल्या गुरुरूपी माऊली पुढे विद्यार्थ्यांनी नृत्य गायन, भाषण सादर केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त असा होता.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या सौ. वर्षा राठोड, संस्था संचालक संगीता बाजपेयी हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात श्री. सुमीत देशमुख, पल्लवी शिरपूरकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

विश्वभारती पब्लिक स्कूल मध्ये “शिक्षकदिन” साजरा
मार्डी रोड स्थित विश्वभारती पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या दिवशी विद्यार्थी शिक्षकांनी एक दिवसीय “स्वयंशासित शाळेचे” आयोजन केले व या प्रसंगी विविध स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी शिक्षकांनी केले. तसेच शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजनही या प्रसंगी करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व भाषणातून तसेच काव्यातून व्यक्त केले.
कार्यक्रमात आपल्या गुरुरूपी माऊली पुढे विद्यार्थ्यांनी नृत्य गायन, भाषण सादर केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त असा होता.

|